ब्युरो टीम : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं ! असे म्हटले जाते. पण कोणत्याही कपलमध्ये कितीही प्रेम असले तरी त्यांच्यात भांडणे होतातच. अर्थात भांडण होणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण या भांडणांना वेळीच आवरले नाही तर त्याचा परिणाम नात्यांवर होतो. त्यामुळे नात्यातील वाद वेळीच मिटवा. आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
माफी मागण्यासाठी पुढाकार घ्या
भांडणात काहीही झाले तरी अनेकदा भांडणात आपण अशा गोष्टी बोलतो ज्यामुळे जोडीदार दुखावतो. अशा वेळी राग शांत झाल्यावर आपली चूक लक्षात घेऊन माफी मागा. माफी मागितल्यामुळे कोणी कमी होत नाही पण भांडण झाल्यावर माफी मागा.
जुन्या गोष्टी भांडणात आणू नका
अनेकदा लोक भांडणात जुन्या गोष्टी घेऊन बसतात, पण जुन्या गोष्टी घेऊन बसण्यात काहीच अर्थ नाही. भांडण झाल्यावर तुम्ही फक्त चालू मुद्द्यावर बोला. जर तुम्हाला जुनी गोष्ट विसरता येत नसेल, तर त्याबद्दल वेगळ्या दिवशी शांत स्वभावाने बोला आणि समस्येचे निराकरण करा. पण सुरु असलेल्या भांडणामध्ये जून्या गोष्टी काढू नका.
माघार घ्या
भांडण झाल्यावर जर तुमची गर्लफ्रेंड रागवली असेल तर भांडण झाल्यावर माघार घ्या. जर तुमचा जोडीदार तर त्यांच्या मुद्द्यावर ठाम असेल तर त्यांच्या थोडा वेळ द्या. त्यांचे मन शांत झाल्यावर तुमचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडा. काही वेळा माणसांना वेळ देणं ही खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या जोडीदाराची तो रागात असतानाही काळजी घ्या.
समजुत काढण्याचा प्रयत्न करा
भांडण असूनही तुम्ही एकमेकांवर प्रेम करु शकता. भांडण संपल्यानंतर एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवा. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्या प्रती प्रेम वाढेल. भांडण झाल्यावर तुमच्या जोडीदाराला समजुत काढण्याचा प्रयत्न करा. भांडणामुळे तुमचे नाते खूप अधीक गडद होईल.
टिप्पणी पोस्ट करा