ब्युरो टीम :शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची घरी नऊ तास चौकशी करण्यात आली. ईडीचे 10 अधिकारी भांडुप येथील संजय राऊत यांच्या घरी चौकशी करीत होते. त्यानंतर पुढील चौकशीसाठी ईडीने त्यांना ईडीच्या कार्यालयात मुंबई येथील या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथेही जवळ जवळ सहा ते साडेसहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा साडेबारा वाजता संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विधीचे विधान आहे, जो जसे करतो, तसेच त्याला भरावे लागते. काॅग्रेस, राष्ट्रवादीच्या नादी लागून त्यांनी हिंदुत्व सोडले. आता या वेळेला यांच्या उपयोगाला कोणी आले का? आता त्यांना हिंदुत्वाचा भगवा गमछा शेवटीला मिरवतात. मद, मस्ती, अहंकार यांचा उपयोग करून कोणी सत्तेचा दुरुपयोग करीत असेल, तर त्यांना तसे भरावे लागेल. शिवसेना नेत्यांचा अहंकार वारंवार त्यांच्या भाषेतून दिसून येत होता. आता तो अहंकार गळाला आहे. अटलजींची सुंदर कविता आहे. "चिंगारी का खेल बडा बुरा होता है। औरों के घर में आग लगाने का सपना खुद के घरमें खरा होता है।।"
टिप्पणी पोस्ट करा