औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिल्यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. मात्र शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
शिंदे म्हणाले, ' औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. मात्र ती कॅबिनेट बैठकच अनधिकृत आहे. त्यामुळे ज्या कॅबिनटमध्ये निर्णय घेतले, तीच बेकायदेशीर होती,' असा दावाही त्यांनी केला. 'उद्या सकाळी आम्ही कॅबिनेट बैठक घेऊन अधिकृतपणे या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत. कारण उद्या कोणीही चॅलेंज करेल, की तुमच्याकडे अधिकारच नाहीत कॅबिनेट घेण्याचे. संभाजीनगर हे नाव बाळासाहेबांच्या मुखातून निघालंय, त्याला स्थगिती देणार नाही. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव होणारच. आमचं हिंदुत्व असलं, तरी अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेतेही आमच्यासोबत आहेत, कारण आम्ही मुस्लिम, शीख, इसाई यांचा अनादर करत नाही,' असंही शिंदे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा