अजित पवार व सुधीर मुनगंटीवार यांची फटकेबाजी

ब्युरो टीम : “एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केलं आहे. बंडखोरी कशामुळे घडली, नेमकं काय घडलं याची माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की, ‘अजित, उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे मला मुख्यमंत्रीपद द्या’ तर मीच उद्धव ठाकरेंना सांगितलं असतं आणि आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं असतं. काहीच अडचण आली नसती,” असं अजित पवार यांनी विधानसभा भाषण करताना सांगितलं. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
राष्ट्रवादीचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंडखोरीवरून कोपरखळी लगावली. एकनाथ शिंदे यांनी पुढील अडीच वर्षे मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं माझ्या कानात सांगितलं असतं, तर मीच उद्धव ठाकरेंना सांगून तुम्हाला या पदावर बसवलं असतं,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच आदित्य ठाकरेंचं नाव खेत काही अडचण आली नसती ना असं म्हणत त्यांनाही टोला लगावला. यावर सभागृहात एकाच हशा पिकला. ते रविवारी  विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या स्वागतपर भाषणात बोलत होते.
अजित पवारांच्या टोलेबाजीला भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिलं. “एकनाथ शिंदेंनी अजितदादांच्या कानात नाही सांगितलं ती त्यांची चूक होती. पण तुम्हाला भविष्यात मुख्यमंत्री बनावं, असं कधी वाटलं तर आमच्या कानात मात्र नक्की सांगा. जयंत पाटलांच्या कानात कधीच सांगू नका, तिथे सांगाल तर धोका आहे. इच्छा होईल तेव्हा फक्त कानात सांगा,” असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी लगावला.

“राहुल नार्वेकर आदित्य ठाकरेंच्या गुरुस्थानी आहेत. नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना शिकवलंय. त्यामुळे आदित्य ठाकरे नार्वेकरांना गुरुदक्षिणा नक्की देतील. शिवसेनेत अजून काही आमदार उरलेत ते गुरुदक्षिणा म्हणून देतील,” असं म्हणत मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने