पाऊस धो धो बरसतोय, पुण्यात - सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय स्थिती आहे , वाचा ..


ब्युरो टीम : पावसाळा सुरू झाल्यापासून पुणेकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या वर्षी धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी असल्यामुळे पुणेकरांना पाणी कपातीलादेखील सामोरे जावे लागले. मात्र, आता पुणेकरांची ही चिंता मिटली आहे. कारण, हवामान विभागाने येत्या ६ ते ८ जुलै दरम्यान पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोणावळ्यात काल यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल हवामान खात्याकडून लोणावळ्यात १६६ मीमी पावसाची नोंद झाली आहे तर लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे.
दुसरीकडे कोकणात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच ५ ते ९ जुलै या कालावधीत रेड अलर्ट दिला आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने