ब्युरो टीम : स्वत:च्या वजनाचा काटा जसजसा पुढे-पुढे सरकू लागतो, तसतसे आपलं टेन्शनही वाढू लागतं. त्यानंतर विविध व्यायामप्रकारांचा अवलंब करून आणि खाण्यावर नियंत्रण मिळवून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण जर तुमची चयापचयाची क्रिया सुरळीत पार पडत असल्यास वजन कमी करणं सहज शक्य होते.
अन हेल्दी डाइट आणि शारीरिक हालचालींचा अभाव, यामुळे वजन वाढू शकते. चयापचयाचा जास्त वेग वजन कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे केवळ व्यायामच नाही, तर सकस आहार घेणेही आवश्यक आहे. तुम्ही आहारात असे पदार्थ किंवा पेय समाविष्ट करू शकता जे चयापचय गती वाढवण्यास मदत करतात. वेगवान चयापचय तुमची चरबी लवकर बर्न करण्यास आणि आकारात येण्यास मदत करते. चयापचय वेग वाढवण्यासाठी, तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती आरोग्यदायी पेये घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया आहारात तुम्ही कोणते हेल्दी ड्रिंक्स समाविष्ट करू शकता.
- तुळशीच्या बिया किंवा सब्जाच्या बिया यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. या वजन कमी करण्यास मदत करतात. या बियांना तुळशीची थोडी चव असते. त्या ओमेगा -3 फॅटी अॅसिड , व्हिटॅमिन ए, बी, ई आणि के, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह समृध्द असतात. या लहान बिया तुमचा चयापचय वेग वाढवतात, व वजन लवकर कमी करण्यास मदत करतात.
- ब्लॅक कॉफीचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी साखर नसलेली एक गरम कप ब्लॅक कॉफी चरबी बर्न करण्यास मदत करते. याचे जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. यामुळे निद्रानाश देखील होऊ शकतो.
- दुपारी ताकाचे सेवन करू शकता. ताकामध्ये तुम्ही जिरेपूड, काळे मीठ किंवा चिरलेली कोथिंबीर घालू शकता. त्यामुळे त्याची चवही छान लागेल, व वजन कमी करण्यास मदत होईल. ताकामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे तुमचा चयापचय वेग वाढतो, व चरबी जमा होण्यापासून बचाव होतो. दह्यातील निरोगी बॅक्टेरिया देखील तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
- तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाणी आणि लिंबाच्या रसाने करू शकता. त्याचे अनेक फायदे आहेत. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. तुमचे वजन जलद कमी करण्यास मदत करते आणि चयापचय वेग वाढवते. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात पोटॅशियम, फोलेट आणि बी व्हिटॅमिन यांसारखे पोषक घटक देखील असतात. एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात अर्धे लिंबू पिळून सकाळी सेवन करा.
वजन कमी करणे तसे सोपे काम नाही. निरोगी आणि शाश्वत वजन कमी करण्यासाठी लक्षात ठेवण्यासारख्या आणि काळजी घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. चयापचय वेग देखील वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. हा वेग वाढण्यासाठी मात्र आहारात काही पदार्थ्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
टिप्पणी पोस्ट करा