प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची कारवाई


ब्युरो टीम :  राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सक्तवसूल संचालनालय (ईडी) ने कारवाई केली आहे. पटेलांचं मुंबईतील सीजे हाऊसमधील  घरही ईडीकडून जप्त करण्यात आलं आहे. इक्बाल मिरची प्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेलांवर ही कारवाई केली आहे. 

वरळीतील सीजे हाऊसमधील दुसऱ्या मजल्यावर आधीच ईडीने कारवाई केली होती. आज चौथ्या मजल्यावरील घरावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. दुपारी ईडीचे अधिकारी येथे आले होते. त्यानंतर त्यांनी चौथा मजली सील केला.


काय आहे नेमकं प्रकरण ?

वरळी येथे सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली असल्याची माहिती आहे. या व्यवहारात गैरप्रकार झालाचा संशय ईडीला आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेलांवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने