'मविआ' शिंदे सरकार आणखी एक धक्का देणार? वाचा

ब्युरो टीम :  राज्यपाल नियुक्त आमदारांच्या  १२ जागांसाठी नवीन यादी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार देणार आहे. खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता या  यादीत कोणाची वर्णी लागणार आणि राज्यपाल किती दिवसात संबंधित यादीला मंजुरी देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा खूपच कळीचा ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना १२ आमदारांची यादी देण्यात आली होती. ही यादी देऊन जवळपास पावणे दोन वर्षे उलटली, तरीही राज्यपालांकडून या यादीला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता राज्यात शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळलं.  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नव्याने स्थापन झालेले हे सरकार महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण 
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या  १२ जागांसाठी नवीन यादी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार देणार आहे. खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने