मराठा नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही असं उद्धव ठाकरेंनी ठरवलंय, रामदास कदमांचा घणाघात.

 ब्युरो टीम: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं. त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी शरद पवारांचं नेतृत्व स्विकारून चूक केली आहे, त्यामुळे यावर आता त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आधीच दौरे केले असते तर ही वेळ आली नसती, असा हल्लाबोल शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

      प्रतिक्रिया देताना कदम यांनी सेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मराठा नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं आहे. त्यामुळे मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरे यांचाच पालापाचोळा झालाय, अशा आक्रमक भाषेत त्यांनी शिवसेना प्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही जहरी टीका केली आहे. शिवसेनेच्या उभारणीत आदित्य ठाकरे यांचे योगदान काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

      उद्धव ठाकरेंवर आता हातपाय जोडण्याची वेळ आली आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली आहे. नवीन शिवसैनिक आणि नवी पिढी असल्याने तुमच्या भावनेच्या जाळ्यात अडकेल परंतु, जुन्या बऱ्याच शिवसैनिकांचे खून झालेत. अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत. अनेकजण देशोधडीला लागले हे विसरून चालणार नाही. या सगळ्यांच्या बलिदानानंतर आणि लढाईनंतर शिवसेना उभी झाली आहे. संजय राऊत शिवसेना एकत्र ठेऊ शकतील का?, असा सवालही त्यांनी सेनेला केला आहे.

       शिवसेनेतून आमच्या हाकलपट्ट्या ठीकये परंतु मला असा संशय आहे की, उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील नेत्यांना मोठ होऊ द्यायंच नाही. कोणत्याही मराठा नेतृत्वाला मोठ होऊ द्यायचं नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलीये की काय? असा प्रश्न मला पडला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाकरेंनी तीन वर्ष मला बोलू दिलं नाही, रुग्णालयात असताना सहा बैठका झाल्या. मात्र आम्हाला आमंत्रण नव्हते. त्यामुळे तुम्ही रामदास कदम किंवा योगेश कदम यांना नाही तर कोकणतील शिवसेनेला संपवत आहात, असा इशाराही कदम यांनी ठाकरेंना दिला आहे.

.... अनिरुद्ध तिडके 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने