ब्युरो टीम : राज्यात निवडणुकांशिवायच सत्तापालट झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आला आहे. साखर कारखान्यांमधल्या निवडणुकांची देखील लगबग सुरू झाली आहे. अहमदनगरमधल्या अगस्ती साखर कारखान्याच्या निवणुका लवकरच होणार असून त्यासाठी सर्वच पॅनलकडून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. मात्र, यामध्ये स्थानिक राजकारणात वेगळी समीकरणं समोर येऊ लागली आहेत. याचाच परिणाम म्हणून आज अहमदनगरमध्ये प्रचारासाठी गेलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ताफा स्थानिक शेतकरी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अडवला, व जोरदार घोषणाबाजी केली.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा ताफा शेतकरी कार्यकर्त्यांनी अडवला. पवार आज अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखाना निवडणूक प्रचार सभेसाठी आले आहेत. अजित पवार यांनी सीताराम गायकर यांचा प्रचार करू नये अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला. याप्रकरणी पोलिसानी शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह काही जणांना ताब्यात घेतले. अजित पवारांनी गायकर यांचा प्रचार करु नये म्हणून घोषणाबाजी करणारे शेतकरी मधुकर पिचड समर्थक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अजित पवार यांचा ताफा कार्यकर्त्यांनी अडवला, यामुळं पोलिसांनी शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांनी सावंत यांना ताब्यात घेतल्यानं निषेध केला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला होता. पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकाही चांगल्याच गाजतात. अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. अर्थात मागील विधानसभा निवडणुकीत पिचड यांनी साथ सोडल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांनीही या कारखान्याच्या निवडणुकीत आधीपासूनच लक्ष घातले आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात ते सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. मात्र, ज्यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत, त्या सीताराम गायकर यांच्यावर पवार यांनी एकेकाळी कठोर टीका केली होती.
टिप्पणी पोस्ट करा