संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी, दीपाली सय्यद यांचा अजब सल्ला


ब्युरो टीम:
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले बगायला मिळत आहे. सध्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या दीपाली सय्यद  यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी, असे त्या म्हणाल्या आहेत. त्या देवेंद्र फडणवीस  यांचीही भेट घेणार आहेत. इतकेच नाही तर त्या म्हणाल्या की, मला वाटते एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे  यांनी एकत्र यावे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार आलेले आहे.
दरम्यान, पक्षात झालेलं बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने