ब्युरो टीम : नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या ३५ वर्षीय धर्मगुरुंची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती असं या धर्मगुरुंचं नाव असून ‘सुफी बाबा’ नावाने त्यांना ओळखलं जात होतं. डोक्यात गोळी झाडण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारमधून पळून गेले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, या हत्येमध्ये चालक प्रमुख संशयित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद चिश्ती अनेक वर्ष नाशिकमधील येवलामध्ये वास्तव्यास होते. या हत्येमागे कोणतंही धार्मिक कारण असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. संपत्ती किंवा पैशांच्या वादातून हत्या झाल्याचं निष्पन्न होत आहे. मात्र पोलीस इतर सर्व बाजूंची पडताळणी करत आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा