तुमची प्रत्येक चाल सरकार उलथवून लावण्यासाठी, भास्कर जाधव कडाडले


ब्युरो टीम : ‘सरकार स्थापन झाल्यापासून तुमची प्रत्येक चाल सरकार उलथवून लावण्यासाठी होती. राज्यात करोनासारखं संकट आले. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. एक विचारधारा आहे. राज्य संकटात असताना सरकार कोणाचे आहे हे पाहिलं जात नाही. तर संकटात राज्य बाहेर कसे येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधक खांद्याला खांदे लावून लढत असतात. मात्र करोनासंकटात तुमची प्रत्येक कृती ही विरोधातील होती,’ असा गंभीर आरोप आज सभागृहात बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव भाजपवर केला आहे. 
एकनाथ शिंदे सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर भाषण करायला भास्कर जाधव उभे राहिले. लोकशाहीत दुसरा आवाज देखील महत्त्वाचा आहे, अशी फडणवीसांच्या वक्तव्याची आठवण करुन देताना माझं बोलणं तुम्ही ऐकू घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करत भास्कर जाधव भाजपवर तुटून पडले.
‘सकाळी सकार पडेल, पंधरा दिवसात पडेल, आज पडेल उद्या पडेल असं म्हटलं गेलं. तुम्ही कधी कोणाच्या हातात भोंगा दिला, कधी कोणाच्या हातामध्ये हनुमान चालिसा दिलात. या महाराष्ट्राची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला. पण सत्ता कायम राहिली,' असे सांगतानाच जाधव यांनी भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी कशा पद्धतीने  प्रयत्न केले जात होते, हे सांगण्यात आले. 'एकनाथराव तुम्ही मुख्यमंत्री झालात, याचा आम्हाला आनंद आहे, पण शिसेना वाचवण्यासाठी दोन पाऊले मागे या. महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल,' असेही जाधव म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने