आधार कार्डमधील बायोमेट्रिक डेटा कसा करतात लॉक, तुह्मी कधी विचार केलाय ?

ब्युरो टीम : खासगी  काम असो की सरकारी, आधार कार्ड आवश्यक बनले आहे. आधार कार्ड नसेल तर बहुतांश कामे करताना अडचणी येतात. आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीकडे असते. पण तुम्हाला माहिती आहे का, आधारमध्ये संवेदनशील माहिती  असल्याने  ते सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. 
आधार कार्ड हा एक महत्त्वाचा ओळख क्रमांक आहे. अनेक लोक ओळख किंवा पत्ता पडताळण्यासाठी त्याच्या वापर करतात. आधार कार्ड काढताना डोळे आणि फिंगरप्रिंट स्कॅन करावे लागतात. ही बायोमेट्रिक माहिती इतर सेवा वापरताना ओळख पडताळण्यासाठी वापरली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचा बायोमेट्रिक डेटा युआयडीएआय (UIDAI) सर्व्हरवर लॉक करून तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता. तसेच जेव्हा आवश्यक असेल तेव्हा हा डेटा कुठेही अनलॉक करु शकता.

एसएमएसद्वारे बायोमेट्रिक डेटा लॉक कसा कराल ?

बायोमेट्रिक डेटा लॉक आणि अनलॉक करण्यासाठी, तुम्हाला व्हर्च्युअल आयडी तयार करणे आवश्यक आहे. व्हर्च्युअल आयडी युआयडीएआय वेबसाइटला भेट देऊन तयार करता येईल. तसेच तुम्ही 1947 वर एसएमएस पाठवून देखील तो मिळवू शकता.  याशिवाय एसएमएस पाठवून सुद्धा आधार बायोमेट्रिक डेटा लॉक करता येतो. त्यासाठी  तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 1947 वर GETOTP असा एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी LOCKUID आधार क्रमांक टाइप करून 1947 वर पाठवावा लागेल. यानंतर आधार कार्ड लॉक होईल. तर, कार्ड अनलॉक करण्यासाठी, व्हर्च्युअल आयडीचे शेवटचे 6 अंक लिहून 1947 वर पाठवावे लागतील.

असा करा आधार बायोमेट्रिक डेटा लॉक

- सर्व प्रथम युआयडीएआय वेबसाइटवर जा. My Aadhaar and Aadhaar Services अंतर्गत, Aadhaar Lock and Unlock Service वर क्लिक करा.

- तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक करण्यासाठी लॉक युआयडी ऑप्शन निवडा.

- 12 अंकी आधार क्रमांक टाका.

- तुमचे पूर्ण नाव आणि पिनकोड एंटर करा.

- आता सुरक्षा कोड प्रविष्ट करा.

- send OTP वर क्लिक करा आणि एंटर करा.

- नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे OTP पाठवला जाईल.

- पडताळणी केल्यावर, स्क्रीनवर एक संदेश प्राप्त होईल. ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक यशस्वीरित्या लॉक झाला आहे, असे लिहिलेले असेल.


असा करा आधार बायोमेट्रिक डेटा अनलॉक 

- युआयडीएआय वेबसाइटला भेट द्या. My Aadhaar and Aadhaar Services अंतर्गत, Aadhaar Lock and Unlock Service वर क्लिक करा.

- आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी क्रमांक प्रविष्ट करा.

- सत्यापनासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

- send OTP वर क्लिक करा आणि एंटर करा.

- ओटीपी एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा.

आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे दस्ताऐवज आहे. त्यामुळे त्यामधील डेटा हा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास ते सहज शक्य आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने