घरी बसण्यास सांगितलं असतं तर तेही केलं असतं : फडणवीस


ब्युरो टीम : ‘माझ्या नेत्याने मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं. ज्या पत्राने मला सर्वोच्च स्थानावर बसवलं त्यांनी घरी बसण्यास सांगितलं असतं तर तेही केलं असतं,’ असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करतानाच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ज्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या प्रकाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, आज यासर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. 
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला होता. विधानसभेत बहुमताचा हा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने सरकारने जिंकला. ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'एकनाथ शिंदेंच्या पाठीशी पूर्ण ताकद आणि क्षमतेने मी उभा आहे. कारकीर्द अधिक यशस्वी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांच्यात, माझ्यात कधी दुरावा, संघर्ष कुरघोडी दिसणार नाही असंही ते म्हणाले. ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे असाही टोला त्यांनी लगावला. ९९ अशा मतांच्या फरकाने सरकारने जिंकला. ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने