तरुणपणीच केस पांढरे झालेत ? मग ही बातमी वाचाच

ब्युरो टीम : तरुणपणीच तुमचे केस पांढरे झाले आहेत ?  पांढऱ्या केसाची समस्या सुटावी, यासाठी कोणकोणते उपाय फायदेशीर ठरू शकता, याचा जर तुम्ही शोध घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण पांढऱ्या केसांच्या  समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. 

केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये खराब जीवनशैली, आहार, जंक फूड, तणाव आणि प्रदूषण आदींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. पालेभाज्या, दही आणि ताजी फळे यांचा आहारात समावेश करावा. याशिवाय काही छोट्या उपायांनीही तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.

पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका व्हावी, यासाठी काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्याचा फायदा मिळतो. तसेच हे उपाय करण्यासाठी फार खर्च देखील येत नाही. तुम्ही कोणते घरगुती उपाय करून  पांढऱ्या केसांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता, ते पाहुयात...

1. मेथीच्या बिया पाण्यात उकळून थंड होऊ द्या. केस धुण्यासाठी या बियांमध्ये लिंबाचा रस मिसळा. जर तुम्ही कोरफड देखील यात मिसळत असाल, तर तुम्ही सर्व घटकांची पेस्ट बनवू शकता आणि नंतर हेअर पॅकच्या स्वरूपात ती केसांना लावू शकता. हा हर्बल हेअर पॅक तुमच्या पांढर्‍या केसांना सुंदर बनवण्यास मदत करतो. तसेच केसांना निरोगी देखील बनवतो.

2. पांढरे केस चमकदार आणि मऊ करण्यासाठी तुम्ही कॉफी वापरू शकता. कॉफीमध्ये पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि एक किंवा दोन तास राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने धुवा.

3. जास्वंदाच्या पाकळ्या गरम पाण्यात उकळा. त्यामध्ये कोको पावडर आणि कढीपत्ता घालून पेस्ट तयार करू शकता. ही पेस्ट केसांना लावा. केस धुतल्यानंतर त्यांचा रंग लाल दिसेल.

4. आवळा आणि शिकेकाई केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. आवळा आणि शिकेकाई एकत्र पाण्यात उकळा. त्यानंतर त्याचे पल्प काढून त्यापासून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना हेअर पॅक म्हणून लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. तुम्ही आवळा आणि शिकेकाई उकळण्यासाठी वापरलेल्या पाण्यानेही केस धुवू शकता. या उपायामुळे तुमच्या पांढऱ्या केसांना नैसर्गिक काळा रंग येण्यास मदत होईल.

5. गरम पाण्यात मेंहदी पावडर टाकून चांगली मिसळा. जर तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही त्यामध्ये दही घालू शकता. हातमोजे घाला आणि तयार केलेली पेस्ट केसांना लावा. गडद रंगासाठी 2-3 तास ही पेस्ट तशीच राहू द्या. मेंहदीच्या पानांमध्ये असलेला रंग हा पांढऱ्या केसांवर उपचार करण्यास मदत करेलच, त्याचबरोबर केस मऊ आणि निरोगी देखील करेल.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने