श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा, राष्ट्रपतींनी देश सोडला


ब्युरो टीम : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे देश सोडून मालदीवला पळू गेले आहेत. राजपक्षे यांनी देश सोडल्याने नागरिकांचा राग आणखी वाढलाय. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणीची घोषणा केली.
राजधानी कोलंबोत हजारोंच्या संख्येने लोक संसद भवनाकडे येत आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या. यामुळे हिंसाचार देखील वाढला आहे. दरम्यान दोन गटात झालेल्या वादात १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान,राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर नागरिकांनी पंतप्रधानांकडे मोर्चा वळवला आहे. राजधानी कोलंबो येथील पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलक जमा झाले आहे. त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रूधुरांचा वापर केला. मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी अखेर हवेत गोळीबार करण्याची वेळ आली. श्रीलंकेच्या लष्कराने नागरिकांसमोर शस्त्र खाली ठेवली. संसदेत आज अंतरिम राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने