ब्युरो टीम : वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली आहे. सरळवास्तूच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कर्नाटकच्या हुबळीमध्ये एका हॉटेलमध्ये दुपारी चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रशेखर हॉटेलमध्ये कोणालातरी भेटायला गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. रिसेप्शनजवळ असलेल्या चंद्रशेखर यांच्यावर चाकूनं वार होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ च्या सुमारास चंद्रशेखर यांची हत्या करण्यात आली. दोन व्यक्ती अनुयायी बनून त्यांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांनी चंद्रशेखर यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.
कोण होते चंद्रशेखर गुरुजी ?
चंद्रशेखर गुरुजी हे मूळचे कर्नाटकच्या बालगकोट येथील होते. तिथेच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आणि ते इथेच स्थायिक झाले. वास्तू विषयावर त्यांनी अभ्यास केला होता. ‘सरल वास्तू’ या कार्यक्रमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि ते घराघरात पोहोचले. वास्तू विषयावर त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा