जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला

ब्युरो टीम : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शिंजो आबे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी असलेल्या एनएचकेच्या पत्रकाराने बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकला आणि आबे यांना रक्तस्त्राव होताना दिसला. हा हल्ला नारा शहरात झाला. जपानची वृत्तसंस्था एनएचकेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता (भारतीय वेळेनुसार ८.२९ वाजता) घडली. आबे हे शहरातील एका रस्त्यावर भाषण करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यावेळी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आला आणि घटनास्थळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले, असे एनएचकेने सांगितले. 
गोळी लागल्याने आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. 


 कोण आहेत शिंजो आबे ?

६७ वर्षीय शिंजो लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षाशी संबंधित आहेत. आबे हे आक्रमक नेते मानले जातात. शिंजो यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजार होता ज्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आबे यांनी २००६, २०१४, २०१५ आणि २०१७ मध्ये देशाला भेट देऊन भारताशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने