मंत्री नितीन गडकरी हे आता डॉक्टर नितीन गडकरी म्हणुन देखील ओळखले जाणार

          ब्युरो टीम : देशाच्या राजकारणात आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवणारे नागपूरचे खा. व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शिरोपेचत आज आणखी एक मनाचा तुरा खोवण्यात आला, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षान्त समारंभात मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

           राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी हि पदवी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान केली. यावेळी माजी कुलगुरु डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या वेळेस राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदके व इतर पारितोषिके प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला. 

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने