मुंबईचे खड्डे म्हणजे परंपरा, या दिग्दर्शकाने केली उपरोधिक टीका

ब्युरो टीम : 'मुंबईत रस्त्यावर भयानक खड्डे झालेत. अर्थात हे काही नवीन नाही. रोजच्या परवचासारखं प्रत्येक जण एकदा तरी हे म्हणतोच. वर्षानुवर्षे.. रस्त्यावर खड्डे असणे ह्याला आता ‘परंपरा’ मानलं पाहीजे, म्हणजे मग ती अभिमानानी जपता येईल! आणि त्यात पाठ, मान, मणका, गाडीची वाट लागणे हे आपलं योगदान ठरेल!', असे ट्विट प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी करतानाच खड्ड्याच्या समस्यांबाबत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
समीर विद्वांस यांनी मुंबईतील रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यामुळे लोकांना कोणकोणत्या समस्यांना समोर जावं लागतं हे आपल्या ट्वीटमधून उपरोधिक भाषेत मांडलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये मुंबई महापालिका किंवा सरकारला उद्देशून कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण तरीही अप्रत्यक्षपणे सरकारच्या अपयशावर टीका केली आहे.

कोण आहे समीर विद्वांस ?

समीर विद्वांस हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘धुराळा’, ‘आनंदी गोपाळ’ यांसारख्या मराठीतील सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय त्यांनी ‘समांतर २’साठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अलिकडेच त्यांना ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने