विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाणार; शिवसेना पक्षातर्फे दावा करणार - आ. सचिन अहिर

 




ब्युरो टीम: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेला मिळावे, यासाठी पक्षातर्फे दावा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्य सचिन अहिर यांनी शनिवारी दिली.

          विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ दोन्ही काँग्रेसपेक्षा अधिक आहे. यामुळे विधान परिषदेवर विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यात येईल. विधान परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेत अधिक म्हणजे शिवसेनेचे १३ आमदार आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही ही मागणी करू, असे अहिर म्हणाले.

           शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर बंडखोर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. कोणी कितीही दावे केले तरी, निवडणूक चिन्ह कोणी घेऊ शकत नाही. धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेसोबत कायम राहील, असा दावा अहिर यांनी केला. बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर शिवसैनिकांची मानसिकता तयार करून, शिवसेना नव्या जोमाने पुन्हा उभा राहील. त्याची सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले.

          दरम्यान, भाजपकडून प्रभाग रचनेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तथापि हा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा त्यांचा डाव असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने