लग्न सोहळा, पण नवरदेव गायब' असे म्हणत काँगेसच्या या नेत्याने साधली संधी

ब्युरो टीम    : महाराष्ट्र भाजपच्या मुंबईतील कार्यालयात आज सुधीर मुनगंटीवार यांच्यासह, मंगलप्रभात लोढा, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आला आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हिच संधी साधत, 'मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब' असे ट्विट करीत भाजपला खोचक टोला लगावला आहे.  
दरम्यान, आजच्या भाजपच्या जल्लोषाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष, चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन, आशिष शेलार, नितेश राणे अनुपस्थित होते. सत्तास्थापनेसाठीच्या वाटाघाटी आणि इतर बैठकांमुळं देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेते उपस्थित राहिले नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आज भाजपकडून मुंबईतील कार्यालयात यानिमित्तानं जल्लोष करण्यात आला. या जल्लोषाला देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे प्रमुख नेते गैरहजर होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी 'मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब' असं म्हणत भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जल्लोषाच्या कार्यक्रमातील गैरहजेरीवरुन चव्हाण यांनी भाजपला प्रश्न विचारले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने