पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी, चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले


ब्युरो टीम: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  मात्र  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही चर्चा फेटाळून लावली असून भाजपमध्ये कुठलाही अंतर्गत कलह नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ' आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती आहेत. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना याचा हेवा वाटतो, अशा लोकांनी तयार केलेली ही कथा आहे.'
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी  नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.  ते म्हणाले की, 'देशात सध्या दोन विचारधारा आहे. यामध्ये हिंदुत्ववादी विचारधारा एक आहे. हिंदुत्वाचे विचार मान्य असणाऱ्या अनेकांनी त्या-त्या वेळी भाजपासोबत युती केली. २०१९ पर्यंत ही युती कायम होती. पण त्यानंतर हिंदुत्व मागे पडलं आणि खुर्ची पुढे आली. विश्वासघात झाला. जे कधी हिंदुत्व मानत नाही, त्यांचा कधी हिंदुत्वाचा एजेंडा देखील नव्हता, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसले. सुरुवातीला त्यांनी महाशिवआघाडी नाव ठेवलं होतं. त्याचं महाविकास आघाडी कधी झालं कळलं देखील नाही.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने