पपई खात आहात, मग ही बातमी तुमच्यासाठी

ब्युरो टीम : बारा महिने सहज बाजारात मिळणारे फळ म्हणजे पपई.  हे फळ पोटासाठी सर्वोत्तम मानले जाते. यामध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे शरीराच्या अनेक गरजा पूर्ण करतात. पपईमध्ये भरपूर ऊर्जा, फॅट, फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, बी, सी, बी 6, ई, फोलेट थायामिन, बीटा कॅरोटीन, नियासिन आदींचा समावेश असतो. 
पपई केवळ पचनशक्ती चांगली  ठेवत नाही, तर वजन कमी करण्यापासून हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, हाय ब्लड प्रेशर यासारख्या गंभीर समस्यांपासून बचाव करते. पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. मात्र, काही लोकांनी पपईचे सेवन कमी प्रमाणात करावे. कारण असे काही आजार आहेत, ज्यात पपई खाणे फायदेशीर नसून नुकसानकारक  ठरू शकते.

जास्त प्रमाणात पपई खाण्याचे दुष्परिणाम

-पपईमध्ये असलेल्या लेटेक्समधील पॅपेन नावाचा घटक अन्ननलिका खराब करू शकतो.

- त्वचेवर लेटेक्स लावल्याने जळजळ आणि अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.

- गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यात महिलांनी जास्त पपई खाल्ल्याने गर्भात वाढणाऱ्या बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात.

- पपई जास्त प्रमाणात खाल्ल्यास थायरॉईडची समस्या देखील उद्भवू शकते.

- जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल तर पपई खाऊ नका, कारण ते रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते.

- पपई खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

या आजारांमध्ये चुकूनही खाऊ नका पपई!
 
गर्भवती महिलांनी पपईचे अतिसेवन टाळावे. त्यात लेटेक्स, पॅपेन नावाचा घटक असतो, जो गर्भाशयाला संकुचित करू शकतो. ज्या लोकांना किडनीचे आजार, यकृताची समस्या, त्वचेशी संबंधित कोणताही आजार, हायपोथायरॉईडीझम, कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी , किडनी स्टोन आहे ,अशा लोकांनी कमी प्रमाणात पपईचे सेवन करावे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते, आणि त्यात असलेले अँटीऑक्सिडंट किडनी स्टोनची समस्या वाढवू शकतात. त्यात फायबर आणि लॅक्सेटिव्हचे प्रमाण जास्त असल्याने डायरिया आणि ब्लोटिंगची समस्या असेल तर पपई खाणे टाळा. 
पपईमध्ये असलेले फिनॉलिक कम्पाउंड्स (बीटा कॅरोटीन) हे काही दुष्परिणामांना  कारणीभूत ठरू शकतात. ज्या लोकांचे हृदयाचे ठोके अनियमित असतात, त्यांनी पपई खाऊ नये. जर तुम्हाला हायपोग्लायसेमिया म्हणजेच लो ब्लड शुगरची समस्या असेल, तर पपई खाणे बंद करा. कारण त्यात अँटी-हायपोग्लायसेमिक म्हणजेच ग्लुकोज-कमी करणारे घटक असतात, ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी आणखी कमी होऊ शकते. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास पपई खाणे योग्य आहे.

पपईचे सेवन जसे फायद्याचे आहे, तसे ते काही लोकांसाठी नुकसानकारक सुद्धा आहे. त्यामुळे पपई किती प्रमाणात खावी, तिचे सेवन करावे का नाही, हे प्रत्येकाने त्याच्या आरोग्याचा विचार करून ठरवणे, केव्हाही चांगले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने