ब्युरो टीम : अमेरिकेतील महागाईने विक्रमी स्तर गाठला आहे. गॅसपासून ते भाडे आणि अन्न धान्याच्या वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने देशातील महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे.
सीपीआय अर्थात कज्यूमर प्राइस इंडेक्स गेल्या वर्षाच्या तुलनेत ९.१ टक्के वेगाने वाढला आहे. या आधी मे महिन्यात त्याच्या वाढीचा तर ८.६ टक्के इतका होता. महिन्याचा आधार घेतल्यास त्याच्या वाढीचा दर १.३ टक्के इतका आहे. यामुळे फेडरल रिझर्व्हवर पतधोरण अधिक कठोर करण्याची वेळ येऊ शकते. फेडरल रिझर्व्हने महागाईचे लक्ष्य २ टक्के इतके ठेवले होते त्यापेक्षा सध्याची महागाई ५ पट अधिक आहे.
काय होणार भारतावर परिणाम ?
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील कोणत्याही घटनेचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो. अमेरिकेतील महागाई ही भारतीय बाजाराच्या दृष्टीने २ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यावर आलेल्या संकटाचा येणाऱ्या काळात भारतावर देखील परिणाम होऊ शकतो. जागतीक बाजारपेठेत सध्या मंदीचे वातावरण आहे. त्यात आता अमेरिकेतील महागाईने भर घातली. यामुळे आगामी काळात फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. या दरवाढीनंतर गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात करतील. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होईल. गुंतवणूकदारांनी पैसे काढल्याने रुपयात आणखी घसरण होईल.
अमेरिकेत महागाई वाढण्याचे कारण काय?
- पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध होय. व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्यांनी महागाईसाठी युद्धाला जबाबदार ठरवले आहे. अर्थात युद्धाच्या आधी म्हणजे फ्रेबुवारी महिन्यात अमेरिकेत महागाई वाढली होती.
- दुसरे कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यातील तफावत होय. करोनाविरुद्ध लस पटकन शोधल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा झाली आहे. यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
- करोनामुळे ज्या लोकांची नोकरी केली त्यांना सरकारने मदत केली. या लोकांकडून देखील मागणी वाढली आहे. या मागणीच्या तुलनेत पुरवठा मात्र वाढला नाही. सध्याच्य महागाईचे मुख्य कारण मागणी आणि पुरवठा यातील तफावत आहे.
टिप्पणी पोस्ट करा