हार्बर मार्गावर आज दोन तासांचा इमरजन्सी ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

ब्युरो टीम :  मुंबईत सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळं भिंतीची पडछड, दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मशीद स्थानकालगत रहिवासी भागातील भिंतीचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला. यामुळे काही मिनिटांसाठी लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या भिंतीचा भाग सुरळीत करण्यासाठी आज हार्बर मार्गावर इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने हा भाग सुरक्षित करणे महत्त्वाचे असल्याने थोड्यात वेळात हार्बर मार्गावर दोन तासांचा इमरजन्सी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या इमरजन्सी ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वडाळा दरम्यान हार्बर मार्गावर ट्रेन उपलब्ध राहणार नाहीत, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, ब्लॉकच्या दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला, दादर येथून मेनलाइनवर प्रवास करु शकतात, असंही रेल्वे प्रशासनानं नमूद केलं आहे. इमरजन्सी ब्लॉकची वेळ अद्याप रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने