ब्युरो टीम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला तीन आठवडे उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू होऊ शकतो, असे बोलले जात आहे. यामुळेच आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपरिषदेत वाटा देण्याची चर्चा आहे. मात्र, या नेत्यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.
उघडपणे कोणीही बोलत नाही
मंत्रिमंडळ विस्तारात ‘गुजरात पॅटर्न’ लागू करण्याची चर्चा आहे. वरिष्ठ नेते कोणतीही रिक्स घ्यायला तयार नसल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, आम्ही मंत्री होणार, असे उघडपणे कोणीही सांगत नाही.
फडणवीसांचा उनुभव डोळ्यासमोर
शिंदे गट व देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपण सरकारमधून बाहेर पडणार असून, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर पक्षनेतृत्वाच्या दबावाखाली त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. यामुळेच गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच नेते कोणतीही जोखीम न पत्करून गप्प आहेत.
टिप्पणी पोस्ट करा