"संकटात असताना कुणीही 'सेफ' होण्याचा प्रयत्न करतो" - माजी मंत्री अर्जुन खोतकर


ब्युरो टीम
: जालन्यातील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे तर "माणूस संकटात असताना कधीही सेफ होण्याचा प्रयत्न करत असतो." असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. दानवे यांच्या भेटीनंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.
"काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान दानवेंनी आज मला चहापाण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो पण आमच्या भेटीचा कोणीही गैरअर्थ घेऊ नये. मी दिल्लीत का आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, माणसांच्या काही अडचणी असतात, कौटुंबिक असो किंवा कोणतीही असो. तोच ताण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. नाही त्या गोष्टीमध्ये माणसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. माणूस अडचणीत असला तर तो सेफ व्हायचा प्रयत्न करत असतो." असं मत अर्जुन खोतकरांनी दिल्लीत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, अर्जुन खोतकर हे मागच्या काही दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते. त्यामुळे ते शिंदे गचात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर मी शिवसेनेतच राहणार आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. त्यानंतर आज त्यांनी दानवेंची भेट घेतली आहे.
अर्जुन खोतकरांच्या कालच्या भेटीवर राऊतांच्या वक्तव्यावर मी नंतर बोलेन असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. दरम्यान रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, "अजूनही शिवसेना आमच्यासोबतच आहे. खोतकर आणि मी फक्त दीट तास नाहीतर खूप वेळ एकत्र बसत असतो. कारण राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो." असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. दरम्यान भाजपकडून खोतकरांना लोकसभेचे सीट देण्यात येणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. पण दोन्ही नेत्यांच्या बोलण्यातून दानवे आणि खोतकरांची दिलजमाई झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने