ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली त्यांचा बदला घेणार, फडणवीस नेमकं काय म्हणाले ?

ब्युरो टीम : ‘महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असं म्हटल्यानंतर अनेकांनी माझी टिंगलटवाळी केली. मी पुन्हा येईन म्हटलं होतं. मी पुन्हा आलोच नाही तर यांनाही घेऊन आलो आहे. ज्यांनी अपमान, टिंगलटवाळी केली त्यांचा मी बदला घेणार. मी त्यांना माफ केलं हाच माझा बदला आहे. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. सर्वांना संधी मिळते,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानसभेत म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला होता. विधानसभेत बहुमताचा हा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने सरकारने जिंकला. ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे एक वेगळं रसायन आहे, झोपतात कधी आणि जेवतात कधी कळत नाही. २४ तास काम करणारा हा नेता आहे. एखादी निवडणूक, अडचण असते तेव्हा तीन दिवस सलग ते काम करताना दिसतात. मोठ्यातल्या मोठं किंवा लहान व्यक्तीच्या मदतीला जाण्याची शिकवण त्यांना दिघेंनी दिली आहे. ज्यांचं कोणी नाही त्यांचे आनंद दिघे होते. हीच शिकवण त्यांनी एकनाथ शिंदेंना दिली आहे. एकनाथ शिंदे आजही ४००-५०० लोकांना भेटतात. मुख्यमंत्र्यांनी थोडी वेळ पाळली पाहिजे हे मी त्यांना सांगितलं आहे. माणसं भेटली की ते रमतात, समस्या ऐकून घेतात,” असं फडणवीसांनी सांगितलं. शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होतील. त्यांच्यात खूप संयम आहे. त्यातूनच त्यांची जडण घडण झाली असावी असंही ते म्हणाले. गट आणि भाजप सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला होता. विधानसभेत बहुमताचा हा ठराव १६४ विरुद्ध

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने