अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप द्वारे टिपलेल्या विश्वाच्या रंगीत छायाचित्राचं लोकार्पण केलं आहे. सोमवारी सायंकाळी व्हाइट हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बायडन यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. जगातील सर्वात मोठ्या शक्तिशाली अवकाश विज्ञान टेलिस्कोपनं विश्वाचा नवा इतिहास समोर ठेवल्याचं म्हटलं. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी गेल्या महिन्यात पत्रकारांशी संवाद साधताना आपणाला ब्रम्हांडाचं न पाहिलेलं दृश्य दाखवणार असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, नासानं यापूर्वी शक्तिशाली वेब स्पेस टेलिस्कोपद्वारे टिपलेल्या फोटोंचा टीझर जारी केला होता. काल जो बायडन यांच्या हस्ते विश्वाचे रंगीत फोटो जारी करण्यात आले होते. वैज्ञानिकांनी या शक्तिशाली उपकरणामुळं विश्वाच्या निर्मितीची रहस्य उलगडणार असल्याचा दावा केला. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप द्वारे विश्वातील आकाशगंगांची छायाचित्र घेतली आहेत. बायडन यांच्या हस्ते जारी करण्यात आलेल्या वेब फर्स्ट डीप फिल्ड म्हटलं जातंय. त्यामुळं विश्वाबद्दल माहिती मिळेल. फोटोमध्ये एकाचवेळी हजारो आकाशगंगा दिसत आहेत.
फोटोत नेमकं काय ?
नासानं जारी केलेल्या फोटोत हजारो आकाशगंगा आहेत, यामध्ये अनेक बाबी आहेत ज्या निळ्या, नारंगी आणि पांढऱ्या रंगाच्या आहेत, असं बायडन म्हणाले. हा टेलिस्कोप मानवानं लावलेल्या अभियांत्रिकीमधील मोठ्या उपलब्धी सारखा असल्याचं ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा