पावसामुळे मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना, घरांचे नुकसान, तीन जखमी

रात्रभर उसंत घेतलेल्या पावसाने सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांत दमदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून वाहतूकही संथ गतीने सुरू आहे. अशातच कालपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
           चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरात दरड कोसळली आहे. घटनेबाबत माहिती मिळताच चेंबूर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले असून तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तिघंही जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
           मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ही घटना घडली. डोंगराचा काही भाग लागून असणा-या घरांवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या घटनेत तीनजण जखमी झाल्याची सध्या माहिती मिळत आहे. तिघांनाही जवळच असणा-या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. सध्या अग्निशमन दलाच्या वतीने त्याठिकाणी साठलेला मलबा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
           कालही घाटकोपर येथे दरड कोसळली होती. मुंबईच्या घाटकोपर भागात खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली . सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने