निरोगी आयुष्य जगायचय, तर ही बातमी वाचाच

ब्युरो टीम : आरोग्य  चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार आणि फिटनेस ठेवणे जेवढे आवश्यक आहे, काही सवयी  वेळीच सुधारणे तेवढचं आवश्यक आहे. प्रत्यक्षात आपण दैनंदिन जीवनात काही अशा चुका करीत असतो, ज्या  आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्या चुका सातत्याने आपण करत राहतो. मात्र त्याचा थेट प्रभाव हा आरोग्यावर पडत असतो.
तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे आरोग्य हे चांगले राहावे, तुमचे शरीर हे निरोगी असावे, तर तुम्हाला तुम्ही दैनंदिन जीवनात करीत असलेल्या काही चुका टाळाव्या लागतील. 
स्वतःचे शरीर निरोगी राहावे, आरोग्य चांगले राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. नियमित व्यायाम करणे, योग्य आहार घेणे, याला प्राधान्य दिले जाते. परंतु बऱ्याचवेळा दैनंदिन जीवनात होणाऱ्या छोटछोट्या सवयींचे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा सवयी वेळीच बदलण्याची गरज आहे. चला तर मग दररोज तुम्ही अज्ञातपणे काय चुका करत आहात, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, त्या पाहुयात.

जेवण झाल्यानंतर फळ खाणे

जेवण झाल्यानंतर बरेच लोक लगेच फळ खातात. पण जेवल्यानंतर लगेच फळ खाण्याची चूक करू नका. यामुळे पचन क्रियेचा वेग कमी होतो.  पचन क्रिया आणि पोटाच्या  समस्या उद्भवण्याची समस्या यामुळे निर्माण होण्याची शक्यता असते.  फळे खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु जेवण झाल्यानंतर लगेच फळ खाऊ नये. जर तुम्हाला फळे खायचे असेल, तर जेवण झाल्यानंतर  एक तासानंतर खावे.

जेवण झाल्यानंतर व्यायाम करणे

व्यायाम करणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. परंतु जेवण झाल्यानंतर लगेच  व्यायाम  करणे टाळले पाहिजे. कारण असे केल्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित आजार, अस्वस्थता, चिंताग्रस्तपणा आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

जेवणानंतर धूम्रपान करणे

धूम्रपान करणे आणि तंबाखू खाणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण यांचे सेवन हे जेवण झाल्यानंतर लगेच केले जाऊ नये. असे केल्याने तंबाखूमध्ये असलेले निकोटीनची ऑक्सिजनशी प्रक्रिया होऊन आरोग्याविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे

जेवण झाल्यानंतर अनेकांना आळस येतो. अशावेळी जेवण झाल्यानंतर लगेच झोपायला अनेकांना आवडते. मात्र ही चूक टाळली पाहिजे. कारण ही सवय आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने