केंद्र सरकार घेणार देशभरात राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळावे


ब्युरो टीम
: केंद्र सरकारने देशभरात विविध ठिकाणी मासिक तत्वावर पीएमएनएएम अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील 257 जिल्ह्यांमध्ये (एकंदर जिल्ह्यांपैकी 1/3 जिल्हे) प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हे मेळावे आयोजित करण्याचे निर्देश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले असून, मेळाव्याचे ठिकाण निवडण्याचे तसेच स्थानिक परिस्थिती, उत्सव यांचा विचार करून मेळाव्याचा दिवस निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. आतापर्यंत जून आणि जुलै अशा दोन महिन्यात मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पीएमएनएएम लागू करण्यात आलेल्या आंध्रप्रदेश राज्यासह ज्या जिल्ह्यांमध्ये हे मेळावे भरविण्यात येणार आहेत त्यांची राज्यनिहाय संख्या परिशिष्ट 1 मध्ये दिली आहे. वयाची 14 वर्षे पूर्ण (धोकादायक उद्योगांसाठी 18 वर्षे पूर्ण) आणि व्यवसायाच्या स्वरूपानुसार शारीरिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञानविषयक पात्रता प्राप्त असणे असे’ या उमेदवारीसाठीच्या निवडीचा निकष आहेत.
या शिकाऊ उमेदवारी मेळाव्याच्या आयोजनाला  सरकारी माध्यमांद्वारे जसे पत्रसूचना कार्यालय, दूरदर्शन, कम्युनिटी रेडीओ, आकाशवाणी, मायजीओव्ही सारखे समाजमाध्यम मंच  तसेच छापील माध्यमे, डिजिटल माध्यमे (लघुसंदेश), स्थानिक पातळीवर आयटीआयसारख्या संस्थांच्या माध्यमातून राज्य अथवा जिल्हा पातळीवरील सक्रीय सहभाग, पत्रके, शाळा-महाविद्यालयांमध्ये माहितीचा प्रसार, विभागीय कौशल्य मंडळे त्रयस्थ संस्था (टीपीए) तसेच प्रादेशिक कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालये आणि स्थानिक औद्योगिक संस्था यांच्यातर्फे प्रसिद्धी देण्यात येत आहे.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून दर वर्षी देशातील 10 लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी आस्थापना आणि उमेदवार यांच्या सक्रीय सहभागासाठीचा मंच म्हणून पीएमएनएएम हा कार्यक्रम उपयुक्त ठरत आहे आणि अशा मेळाव्यांच्या माध्यमातून सहभागी कंपन्यांमध्ये असणाऱ्या संधींबाबत युवकांमध्ये जागरुकता देखील निर्माण होण्यास मदत होत आहे. गेल्या दोन मेळाव्यांमध्ये सहभागी झालेल्या आस्थापनांचे तपशील, सहभागी युवक आणि  रोजगारविषयक करार यांचा तपशील खाली दिला आहे:

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने