साईभक्‍तांकरीता खुषखबर : वाचा शिर्डी संस्थानने नेमका काय निर्णय घेतलाय ?

ब्युरो टीम : श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने प्रकाशित करण्‍यात येणारी श्री साईबाबा दैनंदिनी २०२२ ही प्रति नग रुपये ४५ नाममात्र दरात व दिनदर्शिका २०२२ ही ५० टक्‍के सवलतीच्‍या दरात सर्व साईभक्‍तांकरीता उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या व्‍यवस्‍थापन समितीने घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.
बानायत म्‍हणाल्‍या, संस्थान व्यवस्थापनामार्फत दरवर्षी श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिका प्रकाशित करणेत येतात. या विविध प्रकारच्या दैनंदिनी व विविध प्रकारच्‍या दिनदर्शिका साईभक्तांना सशुल्क उपलब्ध करुन दिल्या जातात. त्‍यानुसार यावर्षी सन २०२२ ची वैशिष्टयपूर्ण श्री साईबाबा दैनंदिनी ही ०४ भाषेत (मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलगू ) स्वतंत्र्यरित्या प्रकाशित करणेत आलेली आहे. या दैनंदिनीत श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरातील विविध मंदिरे आणि महत्‍वाच्‍या स्थानांची सविस्‍तर मा‍हिती नमुद करण्‍यात आलेली असून या प्रत्‍येक स्थानांच्‍या माहिती समवेत QR CODE देणेत आलेले आहेत. सदरचे QR CODE SCAN केले असता, संबंधित स्थानांची अथवा विभागाची माहिती विविध छायाचित्रांसह दृकश्राव्य पध्दतीने (Video Clip व्दारे) उपलब्ध होते. तसेच याव्यतिरिक्त संस्थानमार्फत साजरे होणारे सर्व उत्सव, धार्मिक व इतर कार्यक्रमांची सविस्तर माहिती, संस्थान प्रकाशित पुस्तके / फोटो, ऑनलाईन देणगी, निवासस्थाने व दर्शन आणि आरती नोंदणी करणे बाबत महत्‍वपुर्ण अशी माहितीचा समावेश करण्‍यात आलेला आहे.
अशाप्रकारे वैशिष्टयपूर्ण असलेली “श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिका २०२२” सर्व साईभक्‍तांना ५० टक्‍के सवलतीच्‍या दरात विक्री करण्‍यात येणार असून सदरची दैनंदिनी ही समाधी मंदिराशेजारील साई कॉम्‍प्‍लेक्‍स व प्रवेशव्‍दार क्रमांक ०४, साईआश्रम, व्‍दारावती, श्री साईप्रसादालय येथील पुस्‍तक विक्री काऊंटर, हैद्राबाद, चेन्‍नई व बंगलोर येथील माहिती केंद्र आणि संस्‍थानच्‍या www.sai.org.in या अधिकृत संकेतस्‍थळावर ऑनलाईन विक्री करीता उपलब्‍ध असणार असल्‍याचे सांगुन सर्व साईभक्‍तांनी या सवलतीच्‍या  दराचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने