मोठी बातमी! राष्ट्रध्वज संध्याकाळीही फडकवता येणार

ब्युरो टीम : केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या काळात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' ही मोहीम जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता राष्ट्रध्वज  सायंकाळीही फडकावता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या बाबतचे परिपत्रक काढले आहे.  त्याशिवाय, यंत्रावर तयार करण्यात आलेले ध्वज फडकावण्यासही मुभा असेल. या बाबतचे निर्देश सर्व मंत्रालये आणि विभागांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, राष्ट्रध्वज मोकळ्या जागेत किंवा नागरिकाच्या घरांवर, आस्थापनांवर दिवसा आणि रात्रीही फडकवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापूर्वी तिरंगा केवळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत फडकवण्याची अनुमती होती. ध्वज हाताने तयार केलेला किंवा यंत्रावर तयार झालेला असावा, कापूस, पॉलिस्टर, रेशीम खादीपासून तो तयार झालेला असावा. तसेच यापूर्वी यंत्रावरील किंवा पॉलिस्टर ध्वजाला अनुमती नव्हती. आता मात्र यंत्रावर तयार करण्यात आलेले ध्वज फडकावण्यासही मुभा असेल. या बाबतचे निर्देश सर्व मंत्रालये आणि विभागांना देण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने