ब्युरो टीम : आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत फिटनेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याच्या मागणीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्र सरकारने २०१७ मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली होती. ज्यामुळे तेव्हा मूळ वेतन ७,००० रुपयांवरुन १८,००० रुपये इतकी वाढली होती. त्यामुळे आज पुन्हा फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ होईल.
कामगार संघटनांची फिटनेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. मूळ वेतनातील महत्वाचा घटक असलेल्या फिटमेंट फॅक्टरचे प्रमाण २.५७ टक्क्यांवरुव ३.६८ टक्के वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी सरकारने मान्य केली तर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८,००० रुपयांवरुन थेट २६,००० रुपये इतके वाढणार आहे.
आज फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय झाला तर लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के इतका आहे. तो ३.६८ टक्के इतका वाढवला तर कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन ८,००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
याशिवाय, केंद्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) चार टक्के वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आणखी चार भत्ते देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन प्रचंड वाढणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा