मोठी बातमी: जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा?

ब्युरो टीम : देशातील सर्वात मोठे मातीची धरण अशी ओळख असलेल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाणे उघडण्यात आले आहे. जायकवाडी धरण जुलै महिन्यातच ९० टक्के भरल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून एकूण ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. तर सध्या धरणात अजूनही ३६ हजार १२९ क्युसेकने आवक सुरूच आहे. 
जुलै महिन्यातच नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने वरील धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यामुळे या धरणांमधून गोदावरी नदीत विसर्ग करण्यात येत आहे. तर पाण्याची आवक मोठ्याप्रमाणावर झाल्याने जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळाले. जायकवाडी धरणात ९० टक्के पाणीसाठा झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सद्या धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, टप्या-टप्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सध्या जायकवाडी धरणातून जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेक, उजवा कालव्यातून ५०० क्युसेक आणि १८ मुख्य दरवाज्यातून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 
दरम्यान, गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिला आहे. तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे. कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याबाबत संबंधित गावांना  तात्काळ सावधानतेचा इशारा देणेबाबत संबधी संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने