भाजप-शिंदे गटाला विधानसभेत बहुमत, विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मतं

ब्युरो टीम : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 
 एकनाथ शिंदे सरकारतर्फे सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. यावेळी विरोधी पक्षाने मतविभागणीची मागणी केली आणि ती अध्यक्षांनी मान्य केली.
विधानसभेत शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडल्यावर मतमोजणीस सुरुवात झाली. यावेळी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांचा क्रमांक येताच ईडी ईडी अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रताप सरनाईक यांनी अर्ध्या तासात तुम्हाला उत्तर देतो असा इशारा दिला. तसेच यामिनी जाधव यांचा अनुक्रमांक येताच पुन्हा ईडी ईडी घोषणा देण्यात आल्या. पण आज यामिनी जाधव यांनी हात जोडत सर्वांना उत्तर दिलं. कालही अशीच घोषणाबाजी झाली तेव्हा यामिनी जाधव यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. 
दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.गेल्या काही दिवसांपासू न राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष दररोज नवनवी वळणे घेताना दिसत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने