ब्युरो टीम: देशात २४ जुलैला आयकर दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मुळचे महाराष्ट्रीयन असलेले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा तमिळनाडू राज्यात सर्वाधिक कर भरल्यामुळे गौरव करण्यात आला. तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारयांना सर्वाधिक कर भरल्याबद्दल सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
रजनीकांत यांना काही कारणास्तव या समारंभास उपस्थित राहाता आले नाही. त्यांची कन्या ऐश्वर्या हीने रजनीकांत यांच्या वतीने पुरस्कार स्वीकाल्याची माहिती आहे.
तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्याकडून हा पुसस्कार वितरित करण्यात आला. ऐश्वर्या हीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. सर्वाधिक आणि नियमित करदात्याची अभिमानी मुलगी, आयकर दिन 2022 रोजी अप्पांचा सन्मान केल्याबद्दल तमिळनाडू आणि पुदुच्चेरी आयकर विभागाचे खूप आभार, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजी गायकवाड आहे. 1975 ते चित्रपट सृष्टीत सक्रिय आहे. त्यावेळी त्यांना मिळणारे मानधन खूपच नाममात्र होते. नंतर त्यांनी 4 दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात दमदार कामगिरी करत ते आता दक्षिणमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता आहेत. भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पद्म विभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर रजनीकांत यांना दादसाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा