या अर्जुनासाठी उद्धव ठाकरे श्रीकृष्णासारखे आहेत, वाचा चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले ?


ब्युरो टीम:
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर ईडीच्या रडावर आहेत. खोतकर ईडीच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. यादरम्यान त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. रावसाहेब दानवे यांच्या घरी खोतकर यांनी ब्रेकफास्टसाठी बोलावण्यात आले होते. दोन्ही नेत्यामध्ये तब्बल तासभर बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेल्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आता शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
'अर्जुन खोतकर ईडीच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. त्यांनी मला याबाबत कल्पना दिली होती. अर्जुन खोतकर हे कडवे शिवसैनिक ते शिंदे गटात जाणार नाही,' असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांचं नाव अर्जुन आहे, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खोतकरांसाठी श्रीकृष्णासारखे आहेत आणि श्रीकृष्ण अर्जुनाला कधीही मार्गदर्शन करतात ,असे खैरे म्हणाले.
रावसाहेब दानवे हा विचित्र माणूस असून त्यांनी जालन्यातील लोकांचा विश्वासघात केला. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करण्यात येत आहे. शिवसेनेच्या आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी यांच्या ईडीचा दबाव टाकण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना देखील ईडीच्या खूप नोटीस आल्या. मात्र ते या दबावाला बळी पडले नाही. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी देखील ईडीला घाबरु नये, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने