इलेक्ट्रिक वाहनांसाठी 90% पेक्षा जास्त घटक आणि त्याचे तंत्रज्ञान (जसे की मोटर/कंट्रोलर/कन्व्हर्टर/बॅटरी व्यवस्थापन यंत्रणा/चार्जर) आपल्या देशात आयात केले जातात. आपल्या पर्यावरण, रस्ते आणि रहदारी यासाठी ते अनुकुल नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) इलेक्ट्रिक वाहन उप-प्रणालींच्या स्वदेशी विकासासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला, 2W/3W साठी तंत्रज्ञानाचा विकास हाती घेण्यात आला. कारण आपल्या रस्त्यांवरील 80% पेक्षा जास्त वाहनांमध्ये ते योगदान देते.
उपरोक्त कार्यक्रमांतर्गत आयआयटी खरगपूरने ई-रिक्षांसाठी स्वदेशी, कार्यक्षम, परवडणारी आणि प्रमाणित बीएलडीसी मोटर आणि स्मार्ट कंट्रोलर विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान काल मेसर्स ब्रशलेस मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे व्यावसायिक उत्पादनासाठी हस्तांतरित करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव अल्केश कुमार शर्मा, अतिरिक्त सचिव डॉ. जयदीप कुमार मिश्रा, समूह समन्वयक ( इलेक्ट्रॉनिक्समधील संशोधन आणि विकास), सुनीता वर्मा, आयआयटी खरगपूरचे डॉ. सोमनाथ सेनगुप्ता, आणि MeitY चे वैज्ञानिक ओम कृष्ण सिंह उपस्थित होते हे तंत्रज्ञान हस्तांतरण डिजिटल इंडिया सप्ताहाचा एक भाग आहे. सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जुलै 2022 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे केले
|
टिप्पणी पोस्ट करा