“तपास यंत्रणांचा दुरुपयोग होतोय, यावर सभागृहात चर्चा व्हावी”, प्रियंका चतुर्वेदींचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र


 ब्युरो टीम:
सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. अश्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं विरोधीपक्षातील म्हणजेच महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. तर ज्यांची भ्रष्टचार केलाय त्यांना शिक्षा होणारच, असं भाजप आणि शिंदेगटातील नेते म्हणत आहेत. अश्यात शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना  पत्र लिहिलं आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरूपयोगावर चर्चा घ्यावी यासाठी प्रियांका पत्र लिहिलं आहे. ईडी, सीबीआय, आयटीचा देशात दुरूपयोग होत असल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी  यांनी केला आहे. इतर विषय सस्पेंड करून यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

प्रियंका चतुर्वेदींचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र

     खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरूपयोगावर चर्चा घ्यावी यासाठी प्रियांका पत्र लिहिलं आहे. ईडी, सीबीआय, आयटीचा देशात दुरूपयोग होत असल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. इतर विषय सस्पेंड करून यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

राऊतांना अटक

        मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अखेर संजय राऊतांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून अटक झाली आहे. काल दिवसभराच्या मारेथॉन चौकशी नंतर मध्यरात्री ईडीने संजय राऊतांना अटक केलेय. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडेबाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली

आता परबांची बारी!

        संजय राऊत यांना ईडी कडून अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण तापला आहे. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी संजय राऊतवर सडकून टीका केली आहे. गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे. अनेकदा संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं. पण राऊतांनी टाळाटाळ केली. संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल, असं रवी राणा म्हणाले आहेत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने