‘मंकीपॉक्स’चे जगभरात १६ हजार रुग्ण

ब्युरो टीम : जागतिक आरोग्य संघटनेतर्फे मागील आठवड्यात शनिवारी ‘मंकीपॉक्स’ला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील जागतिक आणीबाणी जाहीर करण्यात आली. ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग हा संसर्गित प्राण्यापासून माणसाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या संपर्कामुळे होतो. नाकांवाटे बाहेर पडणारे घटक, संसर्गित त्वचा, चेहरा, उघडी जखम आदीद्वारे या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. जगभरात आतापर्यंत ७५ देशांत १६ हजार रुग्ण सापडले असून, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
भारताचा विचार केला तर केरळपाठोपाठ दिल्लीतही ‘मंकीपॉक्स’चा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशातील ‘मंकीपॉक्स’ची रुग्णसंख्या चार झाली आहे.  ‘मंकीपॉक्स’च्या उद्रेकानंतर जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन आढावा घेतला. 
‘मंकीपॉक्स’चा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरांवर तपासणीचा आढावा घेऊन, कडक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने