ब्युरो टीम : शिंदे-फडणवीस सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे इंधनावरील करात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात भाषण करताना लवकरच पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात येईल, असे सांगितले होते. हे आश्वासन शिंदे-फडणवीस सरकारने पूर्ण केले आहे.
आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील करकपातीची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्याने सरकारी तिजोरीवर ६००० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र, त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात राज्य सरकार जनतेला दिलासा देणारे निर्णय घेईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा