अजित पवार आता राज्याचे विरोधी पक्षनेते

ब्युरो टीम : राज्यात सत्तातरानंतर विरोधी पक्षनेते कोण होणार, याबद्दल मोठी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीचे तफडदार नेते आणि आजपर्यंत ४ वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलेले अजित पवार हे विधानसभेचे नवे विरोधीपक्ष नेते असतील. आता विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द जशी गाजली, तशी अजित पवारांची गाजणार का,  हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
अडीच वर्षांचं सरकार चालविल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर आता शिवसेनेचे सहकारी पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी केली आहे. आज आपण सभागृहात अजित पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा झाली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारच्या जनमतविरोधी निर्णयांना नेटाने विरोध करण्याचं काम अजित पवार यांना करावे लागणार आहे. पहिल्यांदाच अजित पवार हे विरोधीपक्ष नेत्याच्या भूमिकेत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. त्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजितदादांच्या नावाची निवड झाली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने