पुढचे काही तास धोक्याचे, हवामान खात्याने दिलाय हा इशारा

ब्युरो टीम :  कोकण-गोवा आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक आदी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून कोकणपट्ट्यात अतिवृष्टी होत आहे. तर, मुंबई, ठाणे भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान,  पुढील दोन – तीन तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने  वर्तवली आहे. तसेच मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणातील काही भागांवर दाट ढग जमा झाले असून या परिसरात पुढील दोन – तीन तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने