केस गळतीने टक्कल पडतंय ? मग ही बातमी तुमच्यासाठी

ब्युरो टीम : केस गळायला लागले की, आपल्याला टेन्शन येतं. आपल्याला टक्कल तर पडणार नाही ना ? असेच वाटते. टक्कल पडल्यानंतर कोणी आपल्याला तर चिडवणार तर नाही ना ?  असाही प्रश्न सतावतो. किमान 100 पैकी 60 ते 70 लोकं केसगळतीने त्रस्त असल्याचे आढळून येते. इतक्या मोठ्या प्रमाणावर केसगळतीची समस्या वाढली आहे. यामागे करणे तशी खूप आहेत. सतत बदलते ऋतू, वातावरण, धूळ, प्रदूषण हे काही प्राथमिक घटक केसगळती वाढवतात. पण त्याशिवाय सध्याच्या पिढीची बदलती जीवनशैली, शिवाय ताण तणावातले जीवन यामुळे केस गळतीची समस्या अधिक प्रकर्षाने समोर येऊ लागते.
तुम्ही सुद्धा केसगळतीने खूप त्रस्त असाल आणि अनेक उपाय वापरून तुम्हाला फरक दिसेल नसेल ? तर आता काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे. तुम्ही आता उपाय करण्याऐवजी औषधे वापरण्याऐवजी आपल्या आहारात काहीतरी बदल केला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींची माहिती देणार आहोत ज्यामुळे तुमची केस गळतीची समस्या कमी होऊ शकते.

ग्रीन टी

ग्रीन टी सुद्धा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर समजले जाते. पण खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहित आहे की ही ग्रीन टी हेअर फॉल सुद्धा नियंत्रित करण्यात मदत करू शकते. ग्रीन टी फॉलिकल्सना नवसंजीवनी देऊन हेअर ग्रोथ प्रमोट करण्यात योगदान देते. डॉक्टर बत्रा तर असेही म्हणतात की रोज जर ही ग्रीन टी प्यायली तर केस वाढण्यास नक्कीच मोठी मदत होईल.

कडूनिंबाची पाने

कडूनिंब हे उत्तम तत्वांनी अत्यंत जास्त समृद्ध असते. केसगळती थांबण्यासाठी याचा वापर तुम्ही मास्क सारखा सुद्धा करू शकता. कडूनिंबाच्या पानांचा मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी कडूनिंबाची पाने उकळून घ्या आणि मग ती वाटून त्याची पेस्ट बनवा. केसांना शॅम्पू लावल्यावर ही पेस्ट केसांना लावा. 30 मिनिटांनी नंतर हेअर वॉश करा. याचा वापर आठवड्यातून दोन वेळा केला तरी खूप फरक दिसेल.

पालक

पालक हे आयर्न, व्हिटामिन ए, व्हिटामिन सो आणि प्रोटीन स्त्रोत मानले जाते. आयर्नची कमतरता हे सुद्धा केसगळतीचे एक प्रमुख कारण आहे. पालकचा वापर आहारात केल्याने याचा फायदा केसांची हेल्थ सुधारण्यासाठी होतो. त्यामुळे पालकचे सेवन केल्याने केवळ आयर्नची कमतरताच भरून निघणार नाही तर यात असलेले नॅच्युरल सीबम केसांसाठी हेर कंडीशनर म्हणून काम करते. पालकच्या भाजीमध्ये ओमेगा 3 एसिड, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि कॅल्शियम स्केल्पला हेल्दी राखण्यात मदत करते.

गाजर

जर तुम्हाला लांब आणि मजबूत केस हवे असतील तर तुमच्या आहारात गाजराचा समावेश नक्की करा. व्हिटॅमिन-ए ने समृद्ध असलेली ही भाजी केसांच्या वाढीस मदत करते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे गाजर खाणे ही समस्या नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरते. तसेच कोरड्या स्कॅल्पची आणि खाज सुटण्याची समस्या दूर करून केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासही गाजर रामबाण आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने