द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

ब्युरो टीम : देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर आज द्रौपदी मुर्मू या विराजमान झाल्या. मुर्मू यांनी आज देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 
संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू देशाला उद्देशून पहिलं भाषण केलं. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने