करोना लसीचा बुस्टर डोससाठी प्रतिक्षा होणार कमी


ब्युरो टीम : केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने करोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे.  नव्या निर्णयानुसार दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यात किंवा २६ आठवड्यात लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारची सल्लागार समिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी  दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोससाठी ९ महिने किंवा ३९ आठवडे थांबावं लागत होतं. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, “१८ ते ५९ वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना करोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी किंवा २६ आठवड्याने खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस देता येईल.  ६० वर्षांवरील लाभार्थ्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस देण्यात येईल,' असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने